1.2 On saying Please summary with Marathi Translation

 Class 12th English: On saying Please

    While dealing with society we always use common courtesy to smoothen our communication. But do u ever think about the people who don't follow it, reason maybe whatever but it impacts society. 'On saying Please' is chapter 1.2 for the class 12 textbook which discusses the importance of courtesy, good manners, and politeness. Here in this article, the chapter is summarized in a simple way, and Marathi Translation is provided.


On saying please



About The Writer 


    On saying Please it is written by A.G. Gardiner. He was a journalist then appointed as an editor of the Daily News, London under the pseudonym 'Alfa of the Plough’. He is famous for his choice of words and lively humor. His essays are elegant, graceful, and humorous. In his writing, he raised the question of morality in everyday life.


Famous work:

  • 'The Pillars of Society'
  • 'Pebbles On the Shore'
  • 'Many Furrows and Leaves in the Wind'

Other chapters


Summary 

    

    In this essay, A.G. Gardiner has stated the importance of courtesy and politeness through the example of the impatient or angry lift man and the polite, friendly bus conductor. 


The Impatient or Angry lift man:


    In the case of the liftman, the writer shows us how discourtesy and ill manners spoil or pollute. He gives the reference of the incident that happened in a city office when the liftman was fined as he threw a passenger who behaved rudely with him and not used the word “please”. 

    We may feel sympathy for the liftman but violence is not permissible as discourtesy is not a legal offense until you are not harmed physically. There is no legal system against bad manners and impolite behavior. In fact, the law cannot become the guardian of our private manner as not any constitution could cover the vast area of offenses and no covert could administer a law which governed our social civilities, our speech, the tilt of our eyebrows, and all over mood and manner 

    But, It doesn’t mean that we can neglect its damages. It impacts our social relationships very deeply. The pain of kicking soon passes away but the pain of the wound to our self-esteem or vanity can’t be forgotten. Our words can spoil or make one’s day. As in the case of the liftman, it was the chain of the behavior of the people that made the passenger rude and ill-mannered.



The list of people that made the passenger rude
List of the people that made the passenger rude and ill-mannered.

Using common courtesy in communication should be the first requirement of civility. ‘Please ‘, ‘sorry’, ‘Thank you', these are the magical words that smooth day-to-day communication. These words help to establish friendly cooperation and easy give and take while communicating in a society. 


Friendly conductor: 

    The writer gives the example of a polite conductor to show how polite speeches and manners sweeten the atmosphere.

    Generally, we see the conductor who is unpleasant and regards the passengers as his natural enemies whose chief purpose is to cheat him. But the writer had met a conductor who was very friendly and cared for his passengers. One day when the writer was traveling via bus he noticed that he didn’t carry money with him. In such a condition, generally, the conductors assume that the passenger is trying to cheat him. But here the friendly conductor understands the problem and behaves kindly. Not only this but he offered a ticket free of cost. 

    One other day when the writer was on the top of the bus his toe was trampled by the same polite cheerful conductor though the writer was hurt badly he assured the conductor that he didn't hurt him as the conductor is a nice, good-natured person. The conductor is very friendly and polite; he always takes care and helps his passengers to be comfortable. 

  • If it was raining he would run up the stairs to give someone the tip that there was room inside.
  • With old people, he was kindly and cooperative as the son
  • He was also careful and concerned with children as a father
  • He was very friendly and respectful with the young ones and enjoys fun with them
  • He was very helpful to the blind people; he not only set them down safely but also took them across the road or around the corner. 

    The writer was very impressed with the conductor's work. Likewise, bad manners good manners are also infectious if we are surrounded with well-mannered people like the polite conductor then we too behave politely we should take inspiration from such people who are dignified by good temper and kindly feelings 

    We must follow little everyday civilities of behavior that sweeten the atmosphere and make life kindly and tolerable for each other. Because the law can definitely protect us against material attack but in case of restore civilities, neither law nor physical violence will help us 

    

    To conclude the writer suggests subtle and effective revenge to ill-mannered rude people. If the liftman had treated the rude gentleman with politeness then the lift man would have had the victory not only over the rude person but also over himself and that victory matters.


Moral of the lesson: 

    

We should be as polite as possible and make life easier for ourselves as well as others.   


Other chapters




मराठी भाषांतर (Translation In Marathi):

    समाजामध्ये वावरताना आपण नेहमीच सौजन्याने बोलतो, सौजन्यशील शब्दांचा वापर करतो. जेणेकरून कोणीही आपल्यामुळे दुखावल्या जाऊ नये. परंतु समाजामध्ये काही लोक असे ही आहेत की जे उर्माठ पणाने वागतात. अशा व्यक्तीच्या वागण्यामुळे आजूबाजूचे वातावरण हे दुषित होते.  कारण काहीही असू परंतु त्याचा समाजावर विपरीत परिणाम होतो. इयत्ता १२ वीच्या पाठ्यपुस्तकातील unit 1.2 on saying please आपल्याला सौजन्याने वागण्याचे, आणि सभ्यतेचे महत्त्व पटवून दिले आहे. या लेखात 'On Saying Please' या धड्याचा सारांश सोप्या पद्धतीने सांगितला आहे.


सारांश

    On saying please हे ए.जी. गार्डिनर यांनी लिहिले असून या निबंधात, ए.जी. गार्डिनर यांनी अधीर किंवा संतप्त लिफ्ट मॅन आणि सभ्य, मैत्रीपूर्ण बस कंडक्टरच्या उदाहरणाद्वारे सौजन्य आणि सभ्यतेचे महत्त्व सांगितले आहे.

    लिफ्टमॅनच्या उदाहरणातून लेखक आपणास असभ्य वर्तवणुकीचे समाजावर कसे पडसाद उमटतात हे व सभोवतालचे वातावरण कसे   प्रदूषित करतात हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

    एका नगर कार्यालयात घडलेल्या घटनेचा संदर्भ देत लेखक सांगतात की  त्या कार्यालयात काम करणाऱ्या लिफ्टमॅनला एके दिवशी दंड ठोठावण्यात आला. कारण त्याने लिफ्टमध्ये आलेल्या एका व्यक्तीस लिफ्टच्या बाहेर फेकून दिले होते. पण का? कारण होते ते असभ्य वर्तनाचे. तो व्यक्ती लिफ्टमॅनला कठोर स्वरामध्ये फक्त 'Top' म्हणाला तर लिफ्टमॅनला त्याने “टॉप प्लीज” म्हणणे अपेक्षित होते. लिफ्टमनबद्दल आपल्याला सहानुभूती वाटू शकते परंतु हिंसा  करणे  हे चुकीचे आहे. कोणताही कायदा यास परवानगी देत नाही. जर तुम्हाला कोणी शारीरिक इजा पोहोचवली असेल आणि स्वतःच्या बचावासाठी जर तुम्ही प्रतिहल्ला केला तर तुमची निर्दोष सुटका केली जाऊ शकते परंतु असभ्य वर्तनासाठी तुम्ही कोणाला इजा पोहोचउ शकत नाही.

     थोडक्यात काय तर असभ्य वर्तन करणे कायदेशीर गुन्हा होत नाही. वाईट वागणूक आणि अयोग्य वर्तना विरूद्ध कोणतीही कायदेशीर प्रणाली नाही. खरं तर, या सर्व गोष्टी खुप विस्तीर्ण आहेत. त्यामुळे कोणत्याही कायद्यामध्ये या क्षेत्राचा अंतर्भाव होऊ शकत नाही आणि कोणताही कायदा,आपली बोलण्याची पद्धत, भुवया चढवून तोरा दाखविणे  या आणि यासारख्या सर्व प्रकारच्या मनःस्थिती किंवा हावभाव यावर नियंत्रित करू शकत नाही.

    परंतु, याचा अर्थ असा नाही की आम्ही त्याच्या नुकसानीकडे दुर्लक्ष करू शकतो. असभ्य वर्तनाचा  सामाजिक नात्यावर खूप खोलवर परिणाम होतो. एखाद्याला दिलेले शारीरिक  घाव हे भरून निघतात परंतु मनावर झालेला घाव विसरल्या जाऊ शकत नाही. कारण ते व्यक्तीच्या आत्म-सन्मानावर घाव करतात. आपले शब्द एखाद्याचा दिवस खराब करू शकतात किंवा बनवू शकतात. लिफ्टमॅनच्या बाबतीतही, असेच काहीसे घडले. एकाच्या गैरवर्तणूकीचा राग हा दुसऱ्यावर निघत गेला. त्या लिफ्टमध्ये आलेल्या व्यक्तीने त्याच्या कर्मचाऱ्याचा, ज्याने त्याला पाहून गूड मॉर्निंग बोलले नाही, राग लिफ्ट मॅन वर काढला. आता तो कर्मचारी गूड मॉर्निंग बोलला नाही कारण तो त्याच्या बायकोवर चिडला होता जिने नाश्त्याच्या वेळेस तिच्या स्वयंपाकीनिचा राग नवऱ्यावर काढला आणि त्या स्वयंपाकीनीला तीच्या कामवालीने उलट उत्तर दिले परिणामी ती कर्मचाऱ्याचा बायकोशी उद्धट पणे वागली. अशी ही  साखळी बनली व वातावरण दुषित होत गेले.


कामवाली 👉 स्वयंपाकीन 👉 कर्मचाऱ्याची बायको 👉 कर्मचारी 👉 लिफ्टमध्ये आलेल्या व्यक्ती 👉 लिफ्टमॅन         


संवादामध्ये सामान्य सौजन्याचे शब्द वापरणे गरजचे असते. ‘कृपया’, ‘सॉरी’, ‘थँक्स यू’, हे प्रभावी शब्द आहेत जे दैनंदिन व्यवहारात मदतगार ठरतात. हे शब्द समाजात संवाद साधताना मैत्रीपूर्ण सहकार्य आणि सुलभता आणण्यास उपयोगी ठरतात. 


सौजन्यशील कंडक्टर

    

    सभ्य बोलणे आणि शिष्टाचार वातावरण गोडवा निर्माण करतात हे दर्शविण्यासाठी लेखक त्याला भेटलेल्या एका कंडक्टरचे उदाहरण देतात.

    कंडक्टर म्हांटल की आपल्याला सर्व प्रवाशांवर ओरडून बोलणारा आणि प्रवाशी आपला नैसर्गिक शत्रू असून ज्यांचा मुख्य हेतू त्याला फसविणे आहे असे मानणारा व्यक्ती डोळ्यासमोर उभा राहतो. (अर्थात सर्व असे नसतात हे ही इथे लेखक स्पष्ट करतात) परंतु लेखक एका अश्या कंडक्टरला भेटला होता जो अत्यंत मैत्रीपूर्ण आणि आपल्या प्रवाशांची काळजी घेत होता.     एके दिवशी लेखक बसमधून प्रवास करीत असताना त्याने पाहिले की आपण बरोबर पैसे घेतलेले नाही. अशा स्थितीत सामान्यत: कंडक्टर असा समज करतात की प्रवासी त्याला फसवण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु येथे तो कंडक्टर समस्या समजून घेतो आणि दयाळूपणे वागतो. एवढेच नाही तर त्याने विनाशुल्क तिकीटही दिले.

    दुसर्‍या दिवशी जेव्हा लेखक बसमध्ये प्रवास करत होता तेव्हा कंडक्टरने त्याचे पाय पायदळी तुडवले, परंतु लेखकाला त्याचा संताप आला नाही. उलट कंडक्टरने माफी मागताच त्याने त्याला अस्वसित केले की, त्याला कोणतीही  इजा झाली नाही. असे का झाले? तर निव्वळ, कंडक्टरच्या चांगुलपणा मुळे. कंडक्टर खूप मैत्रीपूर्ण आणि सभ्य होता; तो नेहमीच   आपल्या प्रवाश्यांना मदत करत असे आणि त्यांची काळजी घेत असे. याचे उदाहरण----

  • जर पाऊस पडत असेल तर धावत जाऊन तो  आतल्या खोलीची माहिती देत असे.
  • वृद्ध लोकांबरोबर त्यांच्या मुलाप्रमाणे तो दयाळू पणे वागत असे व सहकार्य करीत असे.
  •  लहान मुलांशी तो वडीलाप्रमणे काळजीपूर्वक वागत असे.
  • तो तरुणांशी खूप मैत्रीपूर्ण आणि आदरणीय होता आणि त्यांच्याबरोबर मजा घेत होता
  • तो आंधळ्यांना मदत करणारा होता; त्याने त्यांना केवळ सुरक्षितपणे खाली उतरवतच नसे तर त्यांना रस्ता ओलांडण्यासही मदत करीत असे.

    कंडक्टरच्या कार्याने लेखक खूप प्रभावित झाला होता. लेखक म्हणतात, वाईट वागणूकिप्रमानेच चांगली वागणूक देखील संसर्गजन्य आहे. जर आपण कंडक्टरसारख्या चांगल्या वागणुकीच्या लोकांसह असाल तर आपणसुद्धा नम्रतेनेच वागु. त्यामुळे आपण अश्या लोकांच्या संपर्कात राहिले पाहिजे, अशा लोकांकडून प्रेरणा घेतली पाहिजे.

    आपण वातावरणात गोडवा कसा कायम राहील, आपल्या वागण्याने कोणी दुखावणार नाही याकडे लक्ष कंद्रित केले पाहिजे. ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कारण कायदा नक्कीच भौतिक हल्ल्यापासून आपले रक्षण करू शकतो परंतु नागरिकांच्या असभ्य वर्तन व शिष्टाचारचा वापर न करण्याबाबत कायदा किंवा शारिरीक हिंसाचार आपणास मदत करु शकत नाहीत.

    शेवटी लेखक असभ्य वर्तवणुक करणाऱ्या लिफ्ट मधील व्यक्तिसरख्या लोकांसाठी प्रभावी पर्याय सुचवितात. लेखकाच्या मते जर लिफ्ट माणसाने असभ्य व्यक्तीशी सभ्यतेने वागले असेल तर लिफ्ट माणसाने केवळ असभ्य व्यक्तीवरच नव्हे तर स्वत: वरही विजय मिळविला असता आणि तो  विजय अमूल्य असा असेल.


बोध:

आपण शक्य तितके सभ्य वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले तसेच इतरांचे जीवन सुलभ केले पाहिजे. कोणीही आपल्या शब्दांमुळे दुखवले नाही गेले पाहिजे. 





Post a Comment

3 Comments